Demand of parents of newly appointed teachers (Education Servants) to cancel the period of Education Servant and give direct appointment _ Elgar of agitation in Chief Minister’s district
शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्यात यावा यासंदर्भात उद्या मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे भावी शिक्षकांच्या पालकांचा एल्गार करत आंदोलनाचा निर्धार,
शिक्षण सेवक कालावधी रद्द करुन थेट नियुक्ती देण्याची शिक्षकांची मागणी
या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक आणि पवित्र पोर्टल वरून नव नियुक्त भावी शिक्षक व त्यांच्या पालकांच्या खालील प्रमुख मागण्या राज्य शासनाकडे करणार आहेत.
१) महाराष्ट्र राज्य प्रगत, विकसित, पुरोगामी राज्य आहे. इतर अप्रगत बिहार, मध्य प्रदेश, झारखंड यासारख्या राज्यात शोषक शिक्षण सेवक पद्धत अस्तित्वात नाही. शिक्षण सेवक पद्धत असणे हे महाराष्ट्राला भूषणाव नाही.
२) २०१९ व २०२४ मद्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या शिक्षक भरतीतील शिक्षकांचे सरासरी वय ३४-३५ वर्ष आहे त्यामुळे त्यांना कमाल २३-२४ वर्ष इतका अल्प सेवा कालावधी मिळतो, त्यातही ३ वर्ष शिक्षण सेवक म्हणून होणारी आर्थिक पिळवणूक अन्यायकारक आहे.
३) शिक्षण सेवक कालावधीत शिक्षकांचे ३ वेतन वाढीचे नुकसान होते तसेच सेवा जेष्ठतेवर ही त्याचा नकारात्मक परिणाम होऊन एकंदरीत परिणाम शिक्षकांच्या संपूर्ण सेवा कालावधीवर होतो.
४) अधिक वयाच्या सोबत सदर शिक्षकांवर अधिक प्रापंचिक जबाबदारी आहे, जसे की आई-वडिलांचे आजारपण, मुलांचे शिक्षण इ. ही जबाबदारी तुटपुंज्या मानधनावर पेलवणे शक्य नाही.
५) “समान काम – समान वेतन” असा महाराष्ट्र शासनाचाच शासन निर्णय असताना राज्य शासनाची दुटप्पी भूमिकेमुळे शिक्षण सेवकांवर मात्र अन्याय होत आहे. शिक्षण सेवकांना तणावपूर्ण वेठ बिगारी सारख्या मानसिक स्थितीला सामोरे जावे लागत आहे.
६) महाराष्ट्र पेक्षा छोटे दिल्लीसारख्या राज्यात अकुशल मजुरांना किमान १८००० प्रा. वेतनाची हमी आहे. महाराष्ट्रात मात्र कुशल (D.ED, B.ED, TET, CTET,TAIT) आदी स्पर्धा परीक्षेद्वारे अभियोग्यता सिद्ध केलेल्या शिक्षकांना अल्प मानधनावर काम करावे लागते ही गोष्ट शोषण करणारी व अन्यायकारक आहे.
७) राजस्थान उच्च न्यायालय जोधपुर, रिट याचिका क्रमांक १४६५/२०२० यामध्ये प्रोबेशन कालावधीत पूर्ण पगार द्यावा असे म्हटले आहे.
८) पुणे मनपा, मुंबई मनपा, ठाणे, औरंगाबाद ,नागपूर यासारख्या मेट्रो सिटी मध्ये पवित्र पोर्टल मार्फत नियुक्ती झालेल्या शिक्षकांना अत्यल्प अशा वेतनावर आपली सेवा बजावत असताना आजच्या काळात प्रचंड महागाईला सामोरे जावे लागत आहे.
९) तसेच कोंकण विभाग – सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड यासारख्या पर्यटन क्षेत्रात व दमट वातावरणात पुणे, मुंबई, कोल्हापूर या शहरांमधून धान्य, कड धान्य. भाजी पाला येतो म्हणून तिथे तर महागाई दर हा अतिशय जास्त आहे. तर महागाई ने कंबरडे मोडले जात आहे. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत आहेत, याचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
१०) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये (NEP) शिक्षण सेवक पदाचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे आपण शिक्षण सेवक कालावधी महाराष्ट्र राज्यातून रद्द करावा.
११) नुकतेच पवित्र पोर्टल माध्यमातून निवड झालेले राज्यातील 15 ते 20 शिक्षक हे अपघाताने निधन झाले आहेत, त्यांच्या कुटुंबावर ती संकट कोसळले आहे अशा शिक्षकांवरती राज्य शासनाकडून कोणतेही लाभ मिळत नाहीत याचाही विचार व्हावा.
१२) राज्य शासनाने इतर सर्व विभागातील कंत्राटीकरण बंद केले आहे परंतु शिक्षण सेवक ही एक कंत्राटी पद्धतच असल्यासारखे आहे, त्यामुळे या शिक्षकावरती आर्थिक ताण निर्माण होतो, मुलांच्या शिक्षणाकडे आणि शाळेच्या गुणवत्तेही वर ही याचा विपरीत परिणाम होतो.
ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनी देशाचा जर्मन हुकूमशहा होता. त्याचे २ संक्षिप्त उदाहरणे देतो.
- हिटलर म्हणतो जर एखादे राष्ट्र नष्ट करायचे असेल तर त्यावर कोणताही बॉम्ब गोळा, क्षेपनास्त्रे न डागता त्या राष्ट्राची पिढी घडवणारे कार्य करतात म्हणजे तेथील शिक्षक यांना संपवा म्हणजे ते राष्ट्र आपो आप संपेल.
- एखादे व्यक्तिमत्व / एखादे पद संपवायचे असेल तर त्याला त्याच्या क्षमतेचा विसर पडण्यास भाग पाडायचे
उदा. विद्यार्थ्यांना लवचिक व कौशल्य पूर्ण शिक्षण न देता फक्त शिक्षण देणे, त्यांना पास करत राहणे आणि नंतर काम मिळत नसल्या मुळे बेरोजगारी भत्ता देणे व जे काम करत आहेत त्यांना मानसिक व शारीरिक दृष्ट्या खच्चीकरण करणे.
खरच हे सरकार हिटलर शाही आणत आहे का ???
काय करायला पाहिजे :-
- शिक्षण सेवक पद रद्द होऊन या कालावधीतील पूर्ण वेतन, भत्ते व सेवेचे लाभ पूर्वलक्षी प्रमाणे शिक्षकांना अदा करण्यात यावेत,
- सर सकट पास न करता त्यांच्या क्षमतेने पास होऊ द्या तरी आपल्या राज्याची लोकसंख्या जास्त असल्याने बेरोजगार राहतील ही पण त्यांना भत्ता न देता त्यांना काही तरी काम करून घ्या ज्यातून त्यांना त्यांचे कौशल्य वाढवता येईल तसेच अनुभव पण मिळेल.
तरी शिक्षण सेवक पद रद्द होऊन या कालावधीतील पूर्ण वेतन, भत्ते व सेवेचे लाभ पूर्वलक्षी प्रमाणे शिक्षकांना अदा करण्यात यावेत, शिक्षकाना सन्मानाने वागू द्या.
आणि हा सर्वात महत्वाचे ….